माझी आजी मराठी निबंध Essay on My Grandmother in Marathi: माझ्या जवळची माझी सखी म्हणजे माझी आजी .माझी आजी ही आमच्या कुटुंबातील सर्वात मोठी सदस्य असून ती आता 70 वर्षांची आहे. पण ती फक्त 20 वर्षाच्या मुलीसारखी दिसते, ती दिसायला फार सुंदर आहे. माझी आजी आमच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेते आणि प्रत्येकजण कुटुंबात शांततेने राहतोय तो सदस्य खुश आहे हे सुनिश्चित करते. आम्ही 10 सदस्यांच्या संयुक्त कुटुंबात राहतो व आमची आजी खूप चांगल्या प्रकारे सर्वांची काळजी घेते. ती अजूनही माझ्या वडिलांची आणि माझ्या सर्व काकांची अगदी लहान मुलांसारखी काळजी घेते.
माझी आजी मराठी निबंध Essay on My Grandmother in Marathi
या वयात देखील ती तिच्या कामात इतकी परिपूर्ण आहे व ती तिच्या कामासाठी कधीही निमित्त किंवा कारण देत नाही. तिच्या आजीकडून ऐकलेल्या गोष्टी तिला अजूनही आठवतात आणि ती रोज रात्री माझ्या चुलत भावांना आणि मला सांगते. ती नेहमी अश्या गोष्टी सांगायची की ज्यावरून आम्ही त्या गोष्टीचा विचार करू आणि त्यातील नैतिक मूल्यांची जोपासना करू. तिने कथन केलेल्या प्रत्येक कथेमागे एक सुंदर नैतिकतेचा धडा दडलेला असायचा .
जेव्हा मी अभ्यासाच्या मूडमध्ये नसतो तेव्हा माझ्यामध्ये अभ्यासाबदल गोडी कशी निर्माण करावी हे तिला चांगलेच माहीत होते. आज जर मी माझ्या आयुष्यात यशस्वी झालो तर त्याच सगळं श्रेय तिलाच जाते. माझ्या शाळेच्या दिवसात ती मला गणित आणि विज्ञान शिकवायची कारण माझे आई-वडील नोकरी करत असे.
जरी ती व्यावसायिक शिक्षिका नसली तरी मला मिळालेली ती एक सर्वोत्कृष्ट शिक्षिका आहे. माझ्या लहानपणी तिने मला शिकवलेली सर्व गणितीय सूत्रे मला अजूनही आठवतात. माझ्या यशामागे तिचा मोठा हात आहे. आज माझ्या वागण्या-बोलण्याचं कौतुक होत असेल तर ते फक्त तिच्यामुळेच. तिने मला मोठ्यांचा आदर कसा करावा हे शिकवले व माझ्यावर चांगले संस्कार केले.