माझी बहिण मराठी निबंध Essay on My Sister in Marathi: बहीण म्हणजे एक अस नात ज्याने आपले आयुष्य सुंदर बनवले आहे. फक्त आयुष्य सुंदर नाही तर ते जगण्यायोग्य देखील बनवते. जणू ती आपल्या आयुष्यात असलेले एक सुंदर फुलच आहे. अनेकदा बहीण तुमच्याशी भांडते देखील मात्र शेवटी त्या नेहमी संकटात तुमच्या पाठीशी उभ्या असतात. तुम्हाला चिडविण्यासाठी जरी बहीण पुढे असल्या तरी सुद्धा त्या वेळी त्यांचे तितकेच जास्त प्रेम तुमच्यावर असते.
माझी बहिण मराठी निबंध Essay on My Sister in Marathi
बहीण म्हणजे आपली पहिली मैत्रीण असते. बहीण म्हणजेच आपली दुसरी आई असते कारण तिच्यात मातृत्व गुण देखील असतात. विनोद करण्यासाठी आणि संकट काळात अश्रू पुसण्यासाठी देखील बहीण असते. बहिणीचे सोबत असणें म्हणजे आपल्यासाठी एक मित्र सोबत असण्यासारखे आहे. माझे आयुष्य माझ्या बहिणी विना कसे असेल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. तिने माझे आयुष्य सुंदर आणि आनंददायी बनविले आहे. मला एक मोठी बहीण आहे.माझ्यापेक्षा ती 12 वर्षांनी मोठी आहे. ती सध्या एका महविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
ती एक हुशार आणि समजूतदार व्यक्ती आहे. माझी बहिण माझ्या आईसारखीच आहे. ती सतत माझ्या आईसारखी माझी काळजी घेत असते. लाड करण्याच्या ठिकाणी ती माझे लाड देखील करते मात्र जेव्हा माझी काही चूक होते तेव्हा ती मला रागावते देखील. माझ्या प्रत्येक समस्येला ती ऐकून घेते. माझे जे स्वप्न आहेत त्यांना पूर्ण करण्यासाठी ती सतत मदत करत असते. माझ्या सुखामध्ये तर ती आनंदी असतेच मात्र दुःखामध्ये देखील ती रडण्यासाठी माझी सोबती असते. मला कधीच एकटे वाटू नये म्हणून ती सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. माझ्या बहिणीसोबत माझे बाँडींग अगदी चांगला आहे.
मला आठवते की माझ्या परीक्षांच्या काळामध्ये ती सदैव मला शिकवणी देऊन मदत करत असते. मला शाळेत कधी शिकण्यासाठी मजा आली नाही मात्र परीक्षेच्या काळात माझी बहीण तिचे सर्व काम सोडून माझ्यामध्ये अभ्यास करण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते.
माझ्या इयत्ता 9 वी आणि 10 वी मध्ये असताना बहिणीने मला गणित आणि विज्ञान हे खूप अवघड वाटणारे विषय सहज समजावून सांगितले होते. मला इयत्ता दहावी मध्ये चांगले गुण मिळाले आणि त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या बहिणीला जाते. माझे आणि माझ्या बहिणीचे बोंडिंग किती छान आहे याविषयी हा एक छोटासा प्रसंग होता!